पैठण येथे प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रभाग ५ मधील शेकडो मतदार

Foto
रमेश लिंबोरे
पैठण : पैठण शहरासह ग्रामीण भागात जवळपास २५ हजाराच्या वर दुबार नाव असलेले मतदारांची संख्या असल्याची तक्रार संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे यांनी केली होती. दरम्यान त्यांचे काही दिवसा पूर्वी अपघातात निधन झाले. कै. भाऊसाहेब पिसे यांनी दुबार मतदाराची तक्रार निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, तहसीलदार, यांना लेखी निवेदनाद्वारे पुरावानीशी दाखल केली होती. तसेच विरोधी पक्षातर्फे देखील या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध केली होती. या मतदार यादी मध्ये
सर्वे करणाऱ्या तलाठी, न. प. चे कर्मचाऱ्यांनी एका ठिकाणी बसून केले सर्वे सुद्धा मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांचा तसेच बाहेरील मतदारांचा समावेश असल्याचे आढळून आले. त्यानंतर आक्षेप नोंदविण्यात आले. जवळपास आठ हजार नागरिकांनी या मतदार यादीवर आक्षेप घेतला आहे.

घेतलेले आक्षेप व तक्रारीचे निराकरण करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत परंतु त्यांचे आदेशाला नगरपालिका प्रशासन तसेच सर्वे करण्यासाठी नेमून दिलेले पथकातील कर्मचारी केराची टोपली दाखवत आहेत. आलेल्या आक्षेपानुसार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी १५ पथक नियुक्त केले आहे. हे पथक शहरातील १ते १२ प्रभागात जाऊन दुबार मतदार व बाहेरील मतदारांचा सर्वे करत आहेत. प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रभाग क्रमांक ५,१, ३ तसेच अहिल्यानगर, जालना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तसेच पैठण तालुक्यातील अनेक मतदारांची नावे असताना सर्वे करण्यासाठी नेमण्यात आलेले तलाठी व नगरपरिषदेचे कर्मचारी हे राजकीय लोकांना हाताशी संगणमत करून एका ठिकाणी बसून सर्वे करून घेताना दिसत आहेत.

तक्रारीकडे मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली : 
धक्कादायक म्हणजे या पथकातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर बंद असल्याने त्यांचे संपर्क होत नाहीत. तर तलाठी सदावर्ते हे मोबाईल उचलत नाहीत. प्रभाग ५ मध्ये तसेच इतर प्रभागात असलेल्या मतदारांना प्रभाग क्रमांक ६ मध्ये उभे करून त्यांचे फोटो घेत आहेत व सदरील मतदार हे ६ मध्ये असल्याचे दाखवत आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे या ठिकाणी चक्क दुसरे मतदार उभे करून फोटो काढले जात आहेत या सर्व प्रकाराची योग्य ती चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.